पुणे : पुणे शहरातील विविध महत्त्वाच्या नागरी व प्रशासकीय प्रश्नांबाबत आज आम आदमी पार्टी, पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्यात आली. यावेळी विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून संबंधित मागण्यांचे निवेदन साद करण्यात आले.
१. नागरिकांच्या सोयीसाठी क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करण्याची मागणी
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील नगर रोड क्षेत्रीय कार्यालय आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्राबाबत नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
जवळच्या प्रभागातील नागरिकांना लांब अंतरावरील क्षेत्रीय कार्यालयात जावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. या संदर्भात Google Maps वरील अंतराचे पुरावे साद करून, नागरिकांच्या सोयीचा विचार करून क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्राची पुनर्रचना करावी अथवा संबंधित प्रभागासाठी अधिक सोयीचे कार्यालय निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली.
ही मागणी आपचे उपाध्यक्ष श्री. संतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
२. SIR काम करणाऱ्या शिक्षक व महापालिका कर्मचाऱ्यांना मोबदला देण्याची मागणी
SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादीच्या कामासाठी अनेक शिक्षक आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
या विषयाची गंभीर दखल घेऊन संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियमानुसार त्यांचा प्रलंबित मोबदला तातडीने देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

ही मागणी आपच्या शिक्षक आघाडीच्या अध्यक्षा सौ. शीतल कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
३. बाणेर-बालेवाडीतील DP रस्ते तातडीने विकसित करण्याची मागणी
बाणेर-बालेवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात झालेला बांधकाम विकास आणि त्यातून निर्माण झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेता DP (Development Plan) मधील प्रस्तावित रस्ते तातडीने विकसित करणे आवश्यक आहे, ही मागणी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या DP रस्त्यांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित रस्त्यांसाठी भूसंपादन, रस्ता रुंदीकरण आणि प्रत्यक्ष रस्ते विकासासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.
४. बाणेर-बालेवाडी वाहतूक कोंडीवर स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी
बाणेर-बालेवाडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी हा केवळ वाहतूक पोलिसांचा प्रश्न नसून रस्ते, DP रस्ते, अपूर्ण जोडरस्ते, भूसंपादन आणि नियोजनाशी संबंधित व्यापक प्रश्न आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, संबंधित विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्या सहभागाने बाणेर-बालेवाडी वाहतूक कोंडीवर स्वतंत्र बैठक घेऊन ठोस आणि कालबद्ध उपाययोजना निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.
“पुणे शहरातील नागरिकांच्या प्रश्नांकडे केवळ तक्रार म्हणून न पाहता त्यावर ठोस निर्णय आणि कालबद्ध अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रशासन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत असेल तर त्या मागण्यांचे पुढे प्रत्यक्ष कामात रूपांतर होणे हीच खरी अपेक्षा आहे,” असे आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.
यावेळी संबंधित मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी श्री. धनंजय बेनकर शहराध्यक्ष, श्री. सुदर्शन जगदाळे शहराध्यक्ष तसेच आपचे पदाधिकारी सुभाष कारंडे -महासचिव, मिलिंद ओव्हाळ- युवा उपाध्यक्ष, संतोष काळे – उपाध्यक्ष, कुमार धोंगडे – उपाध्यक्ष, अरुण केदारी, शितल कांडेलकर – शिक्षक आघाडी अध्यक्ष, सुनिता काळे, माधुरी गायकवाड, अविनाश भाकरे, संजय रणधीर, अक्षय वायदंडे उपस्थित होते.