पुणे : सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माननीय संचालक मा. श्री. प्रितम श्रीपती सोनवणे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार २०२६” मिळाला असल्याने पुणे सा.बां. प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता माननीय श्री. अनिल पवार यांच्या हस्ते प्रितम श्रीपती सोनवणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व पुढील यशस्वी कामाबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणेचे अधीक्षक अभियंता मा.श्री. भरतकुमार बाविस्कर साहेब, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणेचे सहाय्यक मुख्य अभियंता मा. श्रीमती दिपाली वाणी मॅडम, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता मा. श्री. प्रशांत खैरमोडे साहेब उपस्थित होते. पतसंस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन २०२५ २०२६ या कालावधीसाठी पुरस्कार देण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, शासन निर्णय क्रमांक: पुरस्कार – १०२६/प्र.क्र.७६ / आस्था – २, मंत्रालय, मुंबई – ४०००३२, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय संजय तवरेज, सह सचिव, महाराष्ट्र शासन यांनी काढले. यामध्ये पूल, विविध विभागांच्या इमारती व इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात येतात. इमारती / पुलांची संकल्पना तयार करून व इतर माध्यमांचा म्हणजे संगणकाचाही उपयोग करून संकल्पनाचित्रे बनवताना तसेच, सार्वजनिक इमारतींची विद्युतीकरणाची कामे करताना व प्रकल्प राबविताना जे तांत्रिक कौशल्य पणाला लागते आणि ज्यामुळे अशा अभियंत्यांची सेवा समाजाला भविष्यात फायद्याची ठरते, अशा अभियंत्यांचे प्रशासकीय तसेच तांत्रिक कौशल्य लक्षात घेऊन त्यांचा वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंत्यांना सन्मानचिन्ह व प्रशासकीयपत्र प्रदान करण्यात येते. सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील खालील विवरणपत्रात नमुद अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२५- २०२६ या कालावधीकरीता वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची संवर्गनिहाय नावे पुढीलप्रमाणे आहेत.
तांत्रिक संवर्ग (स्थापत्य) –
१) श्री. सुरेंद्र अरविंद कंकरेज – अधीक्षक अभियंता, २) श्री. अंकुश अशोकराव पालवे- कार्यकारी अभियंता, ३) श्री. प्रसाद पांडुरंग पाटील- कार्यकारी अभियंता, ४) श्री. प्रल्हाद अनंत पाठक- उप विभागीय अभियंता, ५) श्री. विजय सिध्दीविनायक बापट – उप विभागीय अभियंता, ६) श्री. सचिन निवृत्ती तायडे – सहायक अभियंता श्रेणी – १, ७) अ) श्री. अजय शरदराव देशमांडे – उपविभागीय अभियंता, ब) श्री. आशिष त्रिंबक बिराजदार- उप विभागीय अधिकारी, ८) श्री. आशिष मनोहर पाटील – कनिष्ठ अभियंता, ९) श्री. शैलेश विष्णू साबळे – कनिष्ठ अभियंता, १०) श्री. निलेश बालाजी को व्हाळे – कनिष्ठ अभियंता, ११) श्री. अनिल ज्ञानोबा होळकर – शाखा अभियंता, १२) श्री.विशाल आनंद दुर्गम- कनिष्ठ अभियंता, १३) श्री. सुधाकर उत्तमराव चौरे – शाखा अभियंता, १४) श्री. संजय दुलसिंग राठोड – शाखा अभियंता, १५) श्री. प्रितम श्रीपती सोनावणे – स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, १६) श्री. इरफान चांद शेख – स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, १७) श्री. भरत वसंत राठोड – आरेखक, १८) श्री. संदिप कोंडाजी चिने- आरेखक,
विद्युत शाखा –
१९) श्री.किशोर आसाराम येसनपुरे – उपअभियंता (विद्युत) वास्तुशास्त्र शाखा, २०) श्रीमती कविता बाबुराव रंगारी – उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ अतांत्रिक संवर्ग मंत्रालय (खुद्द), २१) श्री. प्रदीप रामचंद्र को पार्डे – कक्ष अधिकारी, २२) श्रीमती रेश्मा महादेव चौगुले – सहायक कक्ष अधिकारी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई, २३) श्रीमती पूजा प्रफुल्ल दुधाट वरिष्ठ लिपिक, २४) श्री. रूपेश शांताराम कदम – कनिष्ठ लिपिक, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण, २५) श्री. संदीप भरत चाळके – वरिष्ठ लिपिक, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे-, २६) श्री. राजेंद्र बालू लंबाते – वरिष्ठ लिपिक – मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती, २७) श्रीमती मनिषा प्रमोदराव मानकर – वरिष्ठ लिपिक – मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, छ. संभाजीनगर, २८ ) श्री. लखन सोनसिंग राठोड – वरिष्ठ लिपिक – मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक, २९) श्री. महेश दिपक कळमकर – कनिष्ठ लिपिक, ३०) श्री. पुष्कराज लक्ष्मीकांत कुलकर्णी-भांडारपाल