महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या ऐतिहासिक वास्तुंना “अ” दर्जा देण्यात यावा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) या पक्षाच्या वतीने मागणी

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट )या पक्षाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना शिष्ट मंडळच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर पिंपरी चिंचवड येथील व तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या बंगल्याला तसेच देहूरोड धम्मभुमी येथील बौद्ध विहाराला “अ” दर्जा देण्यात यावा तसेच देहूरोड रेल्वे स्टेशनचे देहूरोड धम्मभुमी असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी पुणे निवासी जिल्हाधिकारी मा.ज्योती कदम मॅडम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी फिरोज मुल्ला (सर) प्रदेश मुख्य संघटक, राहुल वडमारे अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर, संदीपभाऊ शेंडगे अध्यक्ष छ.शि. मतदार संघ ऍड. ज्ञानेश्वर करचे, आनंद साळवे, कैलास परदेशी, राजू चव्हाण, संदीप ओव्हाळ, इत्यादी नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला असून या ठिकाणी असणाऱ्या बंगल्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले आहे तसेच सदर ठिकाणी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या बंगल्यात अनेक वेळा महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत तसेच या बंगल्यात त्यांनी वास्तव्य केले आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे तसेच त्यांनी या बंगल्यातच आपल्या भारत देशाचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या बंगल्याला विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे या बंगल्याला अ दर्जा देण्यात यावा, त्याच प्रमाणे देहूरोड येथे असणाऱ्या बौद्ध विहारात म्यानमार रंगुन येथे झालेल्या जागतिक परिषदेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती भेट देण्यात आली होती ती मुर्ती स्वतः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५/१२/१९५४ रोजी बुद्धमुर्तीची स्थापना देहूरोड येथे केली आहे त्यामुळे या ठिकाणी असलेल्या बौद्ध विहाराला विशेष असे जागतिक पातळीवर महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या बौद्ध विहाराला अ दर्जा देण्यात यावा तसेच येथील रेल्वे स्टेशनला देहुरोड धम्मभुमी रेल्वे स्टेशन असे नामकरण करण्यात यावे.

तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भीम सृष्टी असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नागरिक पिंपरी चिंचवड शहरात येताना या ठिकाणचा पत्ता सांगताना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीम सृष्टी या ठिकाणचा पत्ता सांगतात त्यामुळे सदर ठिकाणी उल्लेख करण्यात आलेल्या ठिकाणाला अ दर्जा देण्यात यावा त्याच बरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या नकाशावर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचा समावेश करण्यात यावा. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भीम सृष्टी यांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात यावा व सदर भीमसृष्टीला अ दर्जा देण्यात यावा व तसा महासभेत ठराव मंजूर करण्यात यावा अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Please follow and like us: