औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात स्वच्छता अभियान पंधरवड्याची जय्यत तयारी!

पुणे/प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता अभियान पंधरवडा यशस्वी करण्यासाठी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छता अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना व निर्देश देण्यात आले.

गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजता औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (डी.पी. रोड) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

तसेच, मनपाच्या स्वच्छता अभियान स्पर्धेत औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थान मिळवावे, यासाठी मनपा कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, यार्डी व स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. स्वच्छता, नागरिकांचा सहभाग आणि प्रभावी नियोजन यावर विशेष भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती रोहिणीताई चिमटे, सभासद मा. बाबुराव चांदेरे, मा. अमोल बालवडकर, मा. सनी निम्हण, मा. सपनाताई छाजेड, मा. भक्तीताई गायकवाड तसेच सहाय्यक आयुक्त विजय नायकल, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Please follow and like us: