गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि शालेय साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम

पुणे : मातृभाषा मराठी, माझी शाळा वाढली पाहिजे, वाचली पाहिजे, माझे कर्तव्य या उपक्रमांतर्गत नाइनटीज ऑथेटिक स्कूल डे ग्रुप माजी विद्यार्थी संघ आणि श्री. संत नामदेव प्राथमिक/माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने
करण्यात आली.
यावेळी डॉ.मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे रहीम मुलानी, चार्टर्ड अकाउंटट विनायक बचे, मुख्याध्यापक जे.पी.पारशी, प्रभारी इन्चार्ज पुरूषोत्तम दमाळे नंतर देय असलेली तसेच माजी मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला
जाळीद्रे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मध्ये उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ५० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाइनटीज ऑर्थेटिक स्कूल डे ग्रुप माजी विद्यार्थी संघाचे संस्थापक अनिल सरोदे, सचिव यजु चव्हाण, ॲड. अंबादास बनसोडे, सहसचिव
किरण फडतडे, बालासाहेब थोरात, दीपक साळवे, बाबू कांबळे, ज्ञानदेव साळवे, मुमताज खान, दिलीप धोबे, प्रमोद वाघमारे आणि अविनाश घाडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान होऊन त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्याची मदत मिळाली. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला.

Please follow and like us: