पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत “NAMASTE DAY” निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

पुणे/प्रतिनिधी : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार तथा गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय (MOHUA) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत दरवर्षी १४ जुलै हा दिवस “NAMASTE Day” म्हणून साजरा करण्यात येतो. NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत सफाई कर्मचारी, सांडपाणी व सेप्टिक टँक कर्मचारी, नाला सफाई कर्मचारी, STP/FSTP कर्मचारी, कचरा वेचक (Waste Pickers) तसेच इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, स्थानिक स्तरावर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रम, जनजागृती उपक्रम, सुरक्षा प्रात्यक्षिके, प्रशिक्षण सत्रे व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना PPE Kits, NAMASTE ओळखपत्रे, आयुष्मान कार्ड (AB-PMJAY) वितरित करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिनांक १४ जुलै, २०२६ रोजी “NAMASTE Day” निमित पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी ऑडीटोरीयम याठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा प्रावरणे देऊन गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे अनुषंगाने शहरातील सर्व मनपा दवाखान्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग श्री. संतोष वारुळे, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त (छ. शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय) श्री. बाळासाहेब ढवळे पाटील, मा. सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. साधना भांगरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम व सफाई सेवक, घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडील टीम, एच.एम.एस. टीम इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी उपस्थित सर्व सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांचेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणा-या विविध कर्ज तथा अर्थ योजनांची यावेळी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे शेवटी स्वच्छतेची शपथ घेऊन सदरील कार्यक्रम संपन्न झाला.

Please follow and like us: