‘महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६’ ने श्री.प्रकाश विजयसिंग दाभाडे यांचा गौरव

धुळे/प्रतिनिधी : जनतेच्या हिताचा आवाज दैनिक लोक युवा वृत्तपत्र महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार सन्मानित 2026 शेगाव येथे झाल्याबद्दल श्री प्रकाश विजयसिंग दाभाडे सर धुळे डिस्टिक बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस फेडरेशन DDBBFF (राष्ट्रीय पंच IBBFF) हे धुळे जिल्ह्याचे संघटनेचे अध्यक्ष असून राष्ट्रीय पंच आहे यांना दिनांक 2 ऑगस्ट 2026 लोकमान्य बाल गंगाधर टिळक पुण्यतिथी व साहित्यसम्राट लोकशाही हीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जिल्हा धुळे येथे गेल्या पंचवीस वर्षापासून बॉडी बिल्डर क्षेत्रामध्ये बॉडी बिल्डिंग चे बीज रुजणारे बॉडी बिल्डर्स यांना शरीर सौष्ठ स्पर्धेचे वेड लावणारे व्यायामाची आवड निर्माण करणारे नशा पासून दूर ठेवणारे निस्वार्थपणे पंचवीस वर्षापासून अनेक बॉडी बिल्डर यांना खेड्यापासून नॅशनल लेव्हल पर्यंत नेणारे त्यांना घडवणारे श्री प्रकाश विजय सिंग दाभाडे सर यांना आज महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार 2026 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व आपल्या धुळे जिल्ह्याचे व गुरुवर्य मा, डॉ, संजय मोरे सर श्री छत्रपती पुरस्कार विजेते आशिया व भारताचे जनरल सेक्रेटरी व गुरुवर्य कै. राजेंद्र सातपूरकर सर माजी सरचिटनीस महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या आशीर्वादाने नाव त्यांनी उंचावले आहे सर्व संघटनेच्या वतीने व सर्व धुळे टीमच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.


संस्थापक-मार्गदर्शक, क्रीडा प्रशिक्षक व समाजसेवक श्री. प्रकाश विजयसिंग दाभाडे सर यांना “दैनिक लोक युवा वृत्तपत्राच्या” वतीने लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्ताने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र लोकनायक पुरस्कार – २०२६” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी शेगाव येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गेली 25 ते 26 वर्षापासून अधिक काळ इंजिनियर . श्री प्रकाश विजयसिंह दाभाडे यांनी बॉडी बिल्डर्स , शरीर सौष्ठव, शिक्षण, सामाजिक आणि युवक विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व निःस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सौ. धनश्रीताई खाटीकर (अध्यक्ष, मराठी-हिंदी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. वसंतराव पाटील यांना शाल, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुलकर्णी (तरुण भारत), अमोल अंधारे, चंद्रकांत घोराळे (भाजप तालुका अध्यक्ष), बाळासाहेब दामोदर (राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, बुलढाणा) तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

धुळे येथे धुळे डिस्टिक बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस फेडरेशन DDBBFF संघटनेची स्थापना
करून त्यांनी शेकडो राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविले आहेत. गरीब व होतकरू शरीर सौष्ठव पटू यांना मोफत प्रशिक्षण, मार्गदर्शन, आणि संस्कार देत त्यांनी शरीर सौष्ठव क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करून धुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

इंजिनीयर श्री प्रकाश विजयसिंग दाभाडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल धुळे जिल्ह्यात व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रीडा, जिम, व्यायाम शाळा सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे धुळ्यातील सर्वच जिम व्यायाम शाळा , बॉडी बिल्डर्स संघ आणि संपूर्ण शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सर्वान कडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

Please follow and like us: