शिका – संघटन करा आणि संघर्षातून आदिवासींचा विकास करा – नितिन चंदनशिवे ( कवि , दंगलकार )

पुणे/गुरव पिंपळे : आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने ” गुणवंत विद्यार्थी सत्कार – 2026 ” चे आयोजन करण्यात आले. पुणे व पुणे ग्रामीण अशा विविध भागातील इयत्ता 10 वि, 12 वि, पदवी ,इंजिनीरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील युवक – युवती मोठ्या प्रमाणात हजर होते.


आदिवासींचा इतिहास उज्ज्वल असून भारत स्वतंत्र होण्यापूर्वी आदिवासी क्रांतिकारकांनी प्रथम इंग्रजां विरोधी लढा दिला होता, दुर्दैवाने त्यांचा इतिहास लिहिला गेला नाही. आता तो आपल्या गुणवंताच्या हातात आहे, त्याचे नव्याने लेखन करा, शहरात आदिवासी संस्कृती एव्हढी दिसून येत नाही, ती नंदुरबार, गडचिरोली, पालघर तथा महाराष्ट्राच्या बाहेर छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या राज्यात अधिक आहे. ती येथिल समुदायाने अभ्यासावी.
जल, जंगल आणि जमीन हि आदिवासींची जगण्याची, नव्हे अस्थित्वाची ओळख असून ती पुसण्याची भिती असून यासाठी आदिवासी समाजाने जागरूक होणे हि काळाची गरज आहे, हे भाग्य आजच्या तरुण पिढीकडे चालून येत असल्याने आपण हा समृद्ध वारसा जतन करावा. आपण त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे. त्यासाठी संविधानाने ” आदिवासींसाठी भरपूर तरतुदी केल्या असून त्याचा लाभ घ्यावा. चालू परिस्थिती आणि घडामोडी पाहता संविधान धोक्यात असल्याचे जाणवत असून ते पायदळी तुडवण्याच्या प्रवृत्ती समाजात फोपावत आहेत, परंतु कुठल्याही कठीण काळात संविधान सांभाळणे हि काळाची गरज आहे. हि परिस्थिती त्यांनी त्यांच्या ” कांबळे नाही रडला, नुसताच कन्हला. उं ..
या कवितेतून समर्पकपणे मांडला. कांबळे कुण्या जाती – पातीचा, धर्माचा नसून तो भारतमातेचा – संविधान जपनेसाठी धडपडणारा एक ” माणूस ” आहे.
मा. सुधाकर तेलंग ( भा प्र से ) जनसेवा लोकहक्क आयुक्त, पुणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने यशाची शिखरे पादाक्रांत करावी, त्यासाठी खूप हुशार असण्याची आवश्यकता नाही, परंतु जिद्द आणि सातत्य राखल्यास स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता असा आशावाद स्वतःच्या यशातून घालून दिला.
नामदेव गंभिरे, आदिवासी समाज कृती समिती, पुणे यांनी आपल्या प्रस्थाविकात समाजात आज भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊन आदिवासी समाजातील तरुणांनी, नोकरदारानी व राजकीय नेत्यांनी या प्रश्नांबाबत जागरूक राहून ” समाजाचं नेतृत्व करून या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. त्यासाठी त्यांनी कृती समित्यांच्या माध्यमातून ” भीमाशंकर येथील पोखरी महाविद्यालय व ” भामरागड येथील जया पुंगाटी ” या मुलीची शिक्षणातून प्रगती हा इतिहास कथन केला. डॉ पेढेकर यांनी NEET परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


सदरचे कार्यक्रमात खालील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांनी पुढील प्रमाणे गुणवत्ता प्राप्त केली आहे.
अ – इयत्ता 10 वि – श्रावणी पटेकर 91%, समीक्षा कोंढावळे 92%, आयुष सांगडे 92.40%, संस्कृती निर्मळ 94.40%, आरती मरभळ 94.60 %, अनन्या वाजे. 95.60%
ब – इयत्ता 12 वि- वैभव घोडे. 76 %, आर्या गंभिरे 72%, अक्षय कोकणी. 80.17%, रोहन रावते. 91.17% आदी विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, रोख रक्कम व डॉ प्रदीप आंबवणे लिखित ” शिक्षणाच्या वाटा ” हा अंक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन किसन भोजने, गंगाराम सांगडे यांनी केले तर खेवजी भोईर यांनी आभार प्रदर्शन मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खालील संचालकांनी विशेष सहकार्य घेतले.
डॉ पेढेकर, इंजि विलास नवाळी, चिंतामण भुरकुंडे, दिनकर शेळकण्डे, लक्ष्मण भालेकर, सतिश लेंभे, प्रशांत शिंगाडे, ज्ञानदेव बुरुड, गोविंद जंगले, सुदाम चपटे, दुन्दा किर्वे, PC भालिंगे, राजेंद्र रेंगडे, संजय केदारी, सुभाष भवारी, सुभाष मते, GM शेखरें आणि बाळासाहेब रेंगडे इत्यादीं होते.

Please follow and like us: