पर्वती नागरिक कृती समितीतर्फे रक्षाबंधन साजरा

पुणे : सहकार नगर – पर्वती नागरिक कृती समितीतर्फे समाजाच्या सुरक्षितेबद्दल अहोरात्र निष्ठेने कर्तव्य बजावणाऱ्या सहकार नगर पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक संजय कोटेवाड सहाय्यक पोलीस फौजदार जयसिंग शेळके यांच्यासह पोलीस कर्मचारी बांधवांना राख्या बांधून त्यांच्या सेवाभावी कृतज्ञता व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी पवार म्हणाले रक्षाबंधन हा फार मोठा सण आहे हा सण भाऊ आणि बहीण यांच्या अतुल प्रेमाच्या नात्याच्या स्मरण करणार आणि त्या नात्यांमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे पर्वती नागरिक कृती समितीच्या सदस्यांनी सहकार नगर पोलीस स्टेशन येथील अधिकारी अंमलदार त्यामध्ये अगदी महिला अधिकारी महिलांना देखील राखी बांधून उत्सव साजरा केला खरे तर राखीचा धागा विश्वासाचा धागा आहे त्यांनी हा आज राखीचा धागा बांधून त्यांनी पोलिसावर विशेषतः सहकार पोलीस सहकार नगर पोलिसावर एक विश्वास व्यक्त केलेला आहे पोलीस त्यांच्या जीविताचे आणि मालबत्तेचे रक्षण करण्यामध्ये सक्षम आहेत. त्यांच्या विश्वासाला पुणे पोलीस कधी त्याला जाऊ देणार नाही सहकार नगर मधील माझी टीम या भागातील नागरिकांचे जीविताचा आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करील याची ग्वाही देतो.


यावेळी पोलीस कर्मचारी महादेव नाळे, रवींद्र कदम, सचिन माळी ,प्रज्ञा नावडकर, स्वप्निल चौरे, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुप्रिया तांबट, डॉ.अमृता महाजन, शारदा सरोदे, नंदा शेलार, स्मिता सबनीस, आशा गांधी यांनी पोलीसाना औक्षण करून राख्या बांधल्या सूत्रसंचालन संजय कारंडे यांनी केले, प्रास्तविक चंद्रशेखर कोरडे यांनी केले तानाजी शिरोळे यानी आभार मानले.

Please follow and like us: