लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई

बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेवून महिलांचे गळयातील मंगळसुत्र व रोख रक्कम चोरी करणा-या मध्यप्रदेश येथील ०६ महिलांच्या आंतरराज्यीय टोळीला लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केले जेरबंद

पुणे/येरवडा : लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं. १७३/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०३, ३(५) व गु.र.नं. १७४ / २०२६ भा. न्या. सं. कलम ३१९ ( ४ ) ३०९, ३ (५) अन्वये दाखल गुन्हयातील चोरी गेलेला माल व अनोळखी महिला यांचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे तसेच पोलीस अंमलदार पो.शि. ९९५८ / सुरज ओंबासे व पो. हवा. १७३९ / किरण भागीत, पो.शि. ८८४२ अतुल जाधव यांनी घटनास्थळावरील तसेच पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड भागातील आरोपी येत जात असलेल्या मार्गावरील ५० किलोमीटर अंतरावरील १५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेज पाहणी करून आरोपी बाबत माहिती मिळविली. सदर माहितीचे तपास पथकाचे प्रभारी सपोनि निखिल पवार व सपोनि दत्तात्रय लिगाडे यांनी तांत्रिक विश्लेषण करून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. २७/०८/२०२६ रोजी सकाळी ११:०० वा. संगनवाडी पार्किंग नं ०३ येथे सदरच्या महिला मध्यप्रदेश येथे पळून जाणेच्या तयारीत असताना महिला पोलीस हवालदार ७९१६ साबळे, म.पो.शि १४८४ तळेकर म.पो. शि ५९८९ बनसोडे यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले.
त्यांची नावे खालील प्रमाणे- १) निशा शंतनू सिसोदिया वय ३० वर्षे, धंदा मजुरी, रा. आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे मुळ पत्ता कडिया गाव, थाना बोडा, तहसिल पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश, २) प्रिया वाईफ ऑप आसिक सिसोदिया वय वर्षे धंदा मजुरी, रा. कडिया गाव, थाना बोडा, तहसिल पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश, ३) पुनम प्रदिप सिसोदिया वय २७ वर्षे धंदा मजुरी, रा. पत्ता कडिया गाव, थाना बोडा, तहसिल पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश, ४) वर्षा कमल सिसोदिया वय ३५ वर्षे, रा. गुलखेडी, थाना बोडा, तहसिल पचीर, जि. राजगड. भोपाळ, मध्यप्रदेश
५) आसना रघुवीर सिसोदिया वय ३२ वर्षे, गुलखेडी, थाना बोडा, तहसिल पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश, ६) सोनिका निरोत्तम सिसोदिया वय ३७ वर्षे, रा. धंदा कपडे विक्री, रा. जाटखेडी, गुलखेडी, थाना बोडा, तहसिल पचौर, जि. राजगड, भोपाळ, मध्यप्रदेश

नमुद महिलांकडे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे कसुन चौकशी केली असता तपासा दरम्यान अटक महिला आरोपी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व १० मोबाईल फोन असे मिळून एकुण- ७,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पंचनाम्याने जप्त करण्यात आला असून एकुण- ०६ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. गुन्हयाचा अधिक तपास स.पो.नि दत्तात्रय लिगाडे व पो.हवा / ८३५४ श्रीनाथ कांबळे, हे करीत आहेत. नमूद गुन्हयातील महिलांचे तांत्रीक विश्लेषण केले असता, त्यांनी उत्तरप्रदेश, हरियाना, बिहार, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी चोरी केली असण्याची दाट शक्यता आहे.

उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे –
१. लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं १७३ / २०२६ भा. न्या. सं कलम ३०३ (२) ३ (५)
२. लक्ष्मीगनर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं १७४ / २०२६ भा.न्या. सं कलम ३१८ ( ४ ). ३०९. (५ )
३. विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं ३१६ / २०२६ भा. न्या. सं कलम ३०३ ( २ )
४. विश्रामबाग पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं ३१८ / २०२६ भा. न्या. सं कलम ३०३ ( २)
५. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं ४०९ / २०२६ भा. न्या. सं कलम ३०३ ( २ )
६. लष्कर पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं १८५/२०२६ भा. न्या. सं कलम ३०३ ( २ )

सदर कामगिरी ना. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संजय दराडे. पोलीस सह आयुक्त, मा. श्री मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री चिलुमुला रजनिकांत, पोलीस उपआयुक्त परि ०४, ना. श्री सुनिल जैतापुरकर, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वपोनि रविंद्र कदम, पो.नि. (गुन्हे) निळकंठ जगताप, तपास पथकाचे अधिकारी, सपोनि निखिल पवार, सपोनि दत्तात्रय लिगाडे, पोलीस हवालदार श्रीनाथ कांबळे, पो.हवा गणेश लोखंडे, पो.हवा किरण भागीत पोहवा मयुर सुर्यवंशी, पो. अंमलदार सुरज ओंबासे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भिमराव कांबळे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, अमोल वायाळ, अक्षय शिंदे, सचिन कुचेकर, महिला पोलीस हवालदार धनश्री साबळे, म.पो. शि वर्षा तळेकर, म.पो.शि. ऐश्वर्या बनसोडे, यांनी केलेली आहे.

Please follow and like us: