पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील प्रशासकीय, अभियांत्रिकी, आरोग्य व इतर संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरणेबाबत पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे निवेदन स्थायी समिती अध्यक्ष, श्रीनाथ भिमाले यांना देण्यात आले

पुणे : पुणे महापालिकेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांवर (वरिष्ठ अधिकाऱ्यांवर) दुजाभाव आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे काही दिवसापुर्वी अधिकृत तक्रार केली होती. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप दिले जात असून महापालिकेतील सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना डावलले जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाच्या ठिकाणी सन्मानाने वागणूक मिळत नसल्याची आणि अपमानास्पद शब्दांत बोलले जात असल्याची तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात अंतर्गत नाराजी आणि याद चव्हाट्यावर आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पुणे महानगरपालिका कामगार युनियनने पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील प्रशासकीय, अभियांत्रिकी, आरोग्य व इतर संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने भरणेबाबत निवेदन स्थायी समिती अध्यक्ष, श्रीनाथ भिमाले यांना देण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट, कार्य अध्यक्ष मधुकर नरसिंगे, पीएमसी ऍम्पलॉईज युनियनचे अध्यक्ष बजरंग पोखरकर, जनरल सेक्रेटरी श्रीकांत चव्हाण, पीएमसी इंजिनियर्स असोसिएशनचे सचिव सुनिल कदम, डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.गणेश जगदाळे, अधिकारी संघचे उपाध्यक्ष माधव जगताप आणि पुणे महापालिकेच्या विधी प्रमुख अधिकारी अॅड. निशा चव्हाण उपस्थित होते.


या निवेदनामध्ये म्हणतात की, पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील प्रशासकीय, अभियांत्रिकी, आरोग्य तसेच इतर विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे सध्या मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. शासनाकडुन ज्या जागांवर अधिकान्यांची प्रति नियुक्ती मनपा जागांवर झालेली आहे. ती सर्व पदे तातडीने रिक्त करून घेऊन त्यावर महानगरपालिकेकडील अधिकायांना नियुक्त करावी. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील अतिरिक्त महापालिका आयुक्त, उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त या पदावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.


सद्यस्थितीत पुणे महानगरपालिका आकृतीबंधानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदाची माहिती पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे. यामध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदासाठी प्रतिनियुक्तीवर २ जागा आहेत. पण या पदावर ३ जागा भरल्या आहेत. तसे पाहता पदोन्नतीने १ जागा भरणे अत्यावश्यक आहे. पण ती जागा भरण्यात आली नाही. तसेच सद्यस्थितीत पुणे महानगरपालिका आकृतीबंधानुसार उपायुक्त या पदाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये उपायुक्त हे पद ५० टक्के पदोन्नतीने ९ जागा भरणे आवश्यक आहे. पण येथे ८ जागा भरलेल्या आहेत. यातील १ जागा रिक्त आहे. तर प्रतिनियुक्तीने ५० टक्के जागा भरायच्या आहेत. या पदासाठी ९ जागा आहेत. पण येथे १० जागा भरलेल्या आहेत. १ जागा पुणे महापालिकेच्या अधिकान्याला डावलुन भरण्यात आलेली आहे. या खालोखाल सद्यस्थितीत पुणे महानगरपालिका आकृतीबंधानुसार सहाय्यक आयुक्त या पदाची माहिती पुढीलप्रमाणे देत आहोत. यामध्ये ५० टक्के पदोन्नतीने एकुण ११ जागा भरायच्या आहेत. पण येथेही ६ जागा भरल्या आहेत. येथेही पुणे महापालिकेच्या ५ अधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे. तर प्रतिनियुक्तीने २५ टक्के जागा भरायची आहे. यामध्ये ६ जागा असताना येथे १३ जागा प्रतिनियुक्तीवर भरल्या आहेत. यामुळे येथे ७ जागा जास्त आहेत. तसेच या पदासाठी सरळसेवेने २५ टक्के जागा भरावयाची आहे. म्हणजे एकुण ५ जागा पण यासाठी एकही जागा भरलेली नाही. सदर रिक्त पदांपैकी बहुतांश रिक्त पदांवर शासनाच्या विविध विभागांकडून प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून अधिकारी / कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मनपा सेवकामध्ये अन्यायकारक भावना निर्माण झाली असून महानगरपालिकेच्या सेवेत अनेक वर्षे प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावणारे अधिकारी व कर्मचारी आवश्यक ती शैक्षणिक, तांत्रिक तसेच सेवाकालीन अर्हता पूर्ण करूनही केवल पदोन्नतीची प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे पुढील पदावरील संधीपासून वंचित राहत आहेत. परिणामी, महानगरपालिका सेवकांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांचे मनोबल खच्चीकरण होण्यांची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करणे, सेवकांना त्यांच्या सेवाज्येष्ठता, पात्रता व नियमानुसार पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देणे, आवश्यकते नुसार वरिष्ठ पदाचे अतिरिक्त पदभार देणे तसेच सेवकांमध्ये कार्यक्षमता व सकारात्मक वातावरण निर्माण करणे, या दृष्टीने रिक्त पदे शक्य तितक्या लवकर पदोन्नतीने भरणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच, ज्या संवर्गातील पदांसाठी पदोन्नतीची पात्रता पूर्ण करणारे नहानगरपालिका सेवक उपलब्ध आहेत, त्या पदांवर बाह्य/प्रतिनियुक्तीवरील नियुक्त्या करण्यापूर्वी नहानगरपालिका सेवकांना पदोन्नतीची संधी देण्याबाबत प्राधान्याने विचार होणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकतेनुसार वरिष्ठ पदाचे अतिरिक्त पदभार सुपूर्त करणे यामुळे नहानगरपालिका सेवकांनध्ये आपल्या सेवेतच प्रगतीची संधी उपलब्ध आहे असा विश्वास निर्माण होऊन त्यांचा कानातील उत्साह व कार्यक्षमता वाढण्यास निश्चितच नद होईल.
सबब पुणे नहानगरपालिका आस्थापनेवरील प्रशासकीय, अभियांत्रिकी, आरोग्य, मुख्य लेखापाल विभागाक वर्ग -१ च्या पदासाठी तसेच इतर सर्व संवर्गातील रिक्त पदांचा संवर्गनिहाय आढावा घेऊन, पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता व नेवाज्येष्ठता पूर्ण करणाऱ्या पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांची नाहिती तातडीने संकलित करून, नियमानुसार विभागीय पदोन्नती सनितीची कार्यवाही करून रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक ते आदेश / सूचना देण्यात याव्यात. तसेच, ज्या पदांवर सध्या प्रतिनियुक्ती अधिकारी / कर्मचारी कार्यरत आहेत, त्या पदांचीही संवर्गनिहाय तपासणी करून, त्या पदांसाठी नहानगरपालिका सेवेत पात्र व पदोन्नतीसाठी उपलब्ध सेवक असल्यास त्यांना नियमानुसार पदोन्नतीची संधी देण्याबाबत योग्य तो प्रशासकीय निर्णय घेण्यात यावा. तरी, वरील बार्बीचा सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक विचार करून पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील रिक्त पदे पात्र व सेवाज्येष्ठ नहानगरपालिका सेवकांनधून वरिष्ठ पदाचे अतिरिक्त पदभार देणे तसेच रिक्त पदे नियमानुसार पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक ते आदेश देण्यात यावेत, अशी विनंती आहे.

Please follow and like us: