ABC फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्ता रुंदीकरणाचे काम शीघ्रतेने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त श्री.नवल किशोर राम यांनी दिले

पुणे : आज दि. १०/०८/२०२६ रोजी श्री. नवल किशोर राम, महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका, श्री. ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त. महापालिका आयुक्त (विशेष), श्री अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता तसेच श्री. राजेश बनकर प्र.मुख्य अभियंता (पथ) व इतर अधिकारी यांनी नॉर्थ मेन रोड येथील ABC फार्म चौक ते ताडीगुत्ता चौक या रस्ता रुंदीच्या कामाची पाहणी केली असता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या सेवावाहिन्या ताबडतोब स्थलांतरीत करून उर्वरित भूसंपादन प्रक्रिया तातडीने सुरु करून रस्ता रुंदीकरणाचे काम शीघ्रतेने पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहे.


त्यानंतर हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची पाहणी केली असता सदर पाहणी मध्ये सुरु असलेले पावसाळी लाईनचे व ड्रेनेज लाईनचे काम तातडीने पूर्ण करणे बाबत आदेश दिले. सदर प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता सदर प्रकल्प विना अडथळा तातडीने पूर्ण करणे बाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार, तज्ञ सल्लागार यांना सूचना केल्या आहेत.
खराडी केशव नगर पुलाचे कामाची पाहणी केली असता सदरचा पूल वाहतुकीस नागरिकांच्या वर्दळीच्या अनुषंगाने दि. १५/०८/२०२६ रोजी खुला करण्याबाबतची सूचना मुख्य अभियंता (पथ) यांना मा. महापालिका आयुक्त, यांनी केली आहे. तथापि अॅप्रोच रोडची कामे दरम्यानच्या काळात चालू राहतील याबाबत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मा. महापालिका आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी केले.

Please follow and like us: