पुणे : भारताचा ८० वा स्वातंत्र्यादिन समारंभा दिनानिमित्त शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, पुणे महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केले. त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रथम ‘राष्ट्रीय गीत’ (वंदे मातरम) म्हणण्यात आले. त्यानंतर मा.महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस ’राष्ट्रगीत’ व महाराष्ट्र राज्याचे ‘राज्यगीत’ म्हणण्यात आले.

या प्रसंगी मा. महापालिका आयुक्त श्री.नवल किशोर राम, व मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) श्री.प्रजित नायर मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री.ओमप्रकाश दिवटे,आणि विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त,अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाकडून झेंडा वंदन झाल्या नंतर भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकल रॅली पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या सहकार्याने आयोजित केली होती. यामध्ये सायकल स्वार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर सायकल रॅलीची मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे व मा.महापालिका श्री.आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. सदर सायकल रॅली हि पुणे मनपा भवन – मॉडर्न कॅफे – जंगली महाराज रास्ता–खंडोजी बाबा चौक–अलका टॉकीज चौक-टिळक रोड–पुराम चौक–बाजीराव रस्ता –शनिवार वाडा-पुणे मनपा भवन येथे समारोप करण्यात आला.