सोलापूर / बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथे नुकतेच विश्वरत्न, महामानव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्ष गटनेत्या संघमित्रा चौधरी व काळूराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संघमित्रा चौधरी यांचे स्वागत मोठ्या प्रमाणात सर्व महिलांनी केले.
तसेच मिरवणुकीचे उद्घाटन संघमित्रा चौधरी व काळूराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मा.जि.प.सदस्य इंद्रजित चिकणे, शिरीष चिकणे, मा.सरपंच अमोल नरखडे, अशोक उद्धव चिकणे, बापू राऊत, भारिप बहुजन महासंघाचे बार्शी तालुका अध्यक्ष अॅड. विवेक गजशिव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही भव्य मिरवणूक भीमनगर, बस स्टँड, भैरवनाथ मंदिर, ग्रामपंचायत, विठ्ठल मंदिर व विविध चौकातून काढण्यात आली. भिमगीतांच्या तालावर भीमसैनिकांनी जल्लोषात नृत्य करत वातावरण दणाणून सोडले. सजवलेल्या बग्गीतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ब्लू स्टार मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष समाधान चौधरी, खजिनदार अर्जुन चौधरी, सचिव धनाजी चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चौधरी, प्रदिप चौधरी, सागर श्री. चौधरी, बाळू चौधरी, हनुमंत चौधरी, सागर रा. चौधरी, लखन चौधरी, आनंद गायकवाड, अतुल चौधरी, स्वप्नील चौधरी, जीवन चौधरी, नितीन चौधरी, राहुल चौधरी, रणजित चौधरी, सचिन चौधरी, पप्पू चौधरी, सुनील चौधरी, अमित चौधरी, कृष्णा चौधरी, पांडुरंग चौधरी, अजय चौधरी, मोहन चौधरी, विनोद चौधरी, विशाल चौधरी, अभिषेक चौधरी, रोहित चौधरी, महादेव चौधरी, लक्ष्मण चौधरी व इतर भीमसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.
वैराग पोलीस स्टेशनचे सायबर सेलचे अमोल कांबळे, बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल अमित घाडगे, उत्तम चौधरी यावेळी उपस्थित होते.
तसेच यावेळी सार्वजनिक जेवनाची व्यवस्थाही करण्यात आली होती.