कंत्राटी कामगारांच्या उपचारासाठी तडजोड केली जाणार नाही – कामगार हितरक्षक संघ

पुणे : पुणे महानगरपालिकेत १२ ते १५ हजार कंत्राटी कामगार काम करत आहे. त्यांच्या मुलभूत हक्कासाठी फक्त आणि फक्त कार्यालयीन आदेशच काढले जातात. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अगदी तोंडावर महाराष्ट्र दिन, कामगार दिन आलेला असताना निदान या दिवसाचे महत्व काय आहे याची नोंद घेवून प्रशासनातील आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगारांचे जगणे मान्य करून त्यांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे होती. पण तसे होताना दिसत नाही.
पुणे महानगरपालिके अंतर्गत वडारवाडी आरोग्य कोटी, सुमित फॅसिलिटी येथे कार्यरत असलेले कंत्राटी कामगार श्री. लक्ष्मण कांबळे यांना TB सारखा गंभीर आजार झाला असून त्यांच्या पायांची हालचाल देखील व्यवस्थित होत नाही.
उपचारासाठी त्यांना ESI रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे उपचार सुरू असताना अवघ्या ३ दिवसांत त्यांना डिस्चार्ज देऊन आमच्याकडे उपचार होणार नाहीत, Sassoon Hospital येथे जा असे सांगण्यात आले.
ही बाब रुग्णाच्या आरोग्याशी खेळणारी असून ESI अंतर्गत मिळणाऱ्या हक्काच्या उपचारांना नाकारणारी आहे.
दरम्यान, कामगार हितरक्षक संघाचे पदाधिकारी इतर रुग्णांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर संबंधित डॉक्टरांशी तात्काळ चर्चा करून रुग्णाला योग्य उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
संघटनेच्या पाठपुराव्यामुळे रुग्णाला P1 फॉर्म देण्यात आला आणि पुढील उपचारासाठी Bharati Hospital येथे पाठवण्यात आले. सध्या त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळाले आहे. परंतु भारती हॉस्पिटल यांचं म्हणणं असं आहे की, आमच्याकडे नेगटिव्ह आईसुलेट बेड अवलेबल नाही त्यामुळे आईसुलेट बेड अवलेबल नाही त्यामुळे आम्ही त्यांना ऍडमिट करून घेऊ शकत नाही गेली २० तास झाली पेशंट भारती हॉस्पिटल च्या इमर्जन्सी वॉर्ड मदे आहे कुठल्याही प्रकारे उपचार दिले नाही मात्र, हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असून मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतात की, ESI रुग्णाला योग्य उपचार का नाकारले गेले ? गंभीर अवस्थेतील रुग्णाला जबाबदारी झटकून दुसरीकडे का पाठवण्यात आले? अशा प्रकारे कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार किती दिवस सुरू राहणार ?
याचवेळी कामगार हितरक्षक संघाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला ईएसआय अंतर्गत दाखल रूग्णाला होत असलेल्या मानसिक त्रासाबाबत तक्रारी अर्ज केला त्यामध्ये ते म्हणतात की, लक्ष्मण कांबळे हे पेशंट सध्या भारती हॉस्पिटल या रूग्णालयातील इमर्जन्सी
OPD ESIC वॉर्ड’मध्ये ईएसआय अंतर्गत उपचाराकामी दाखल आहेत. परंतु अत्यंत खेदाने नमूद करावे लागते की, संबंधित डॉक्टर पेशंटच्या आईला मानसिक त्रास देत आहेत. रूग्णाला टीबी सारखा गंभीर आजार असताना, आमच्याकडे बेड नाही व उपचार नाहीत ससूनला घेऊन जा असे सांगून जबरदस्तीने कागदावर लिहून घेतले जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून रूग्णाच्या जीवाशी खेळण्यासारखी आहे.
ईएसआय अंतर्गत रूग्णाला योग्य उपचार मिळणे हा त्याचा हक्क आहे. अशा प्रकारे दबाव टाकणे व जबरदस्ती करणे हे अन्यायकारक व कायद्याच्या विरोधात आहे.
तरी आपण या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून संबंधित डॉक्टरांवर योग्य कारवाई करावी रूग्णाला तातडीने योग्य उपचार मिळवून द्यावेत. तसेच कामगार हितरक्षक संघाच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटना तीव्र आंदोलन छेडेल.

Please follow and like us: