महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार ? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

मुंबई : निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय व्यक्त करत, केंद्र सरकार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी ATE यांच्यावरही निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे निवडणूक आयोगावर ‘फ्रॉड’ (फसवणूक) केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारचा खोटरडापणा उघडा करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी S. I.R. च्या नावाखाली निवडणूक आयोगाने ज्या एका प्रभागातील मतदान अस्तित्वात राज्य निवडणूक नाही असे म्हणून कमी केले आहे, त्या कुटुंबाचा मेळावा घेऊन माध्यमांसमोर हे सर्व उघडे केले असते, तर निवडणूक आयोग फ्रॉड करतोय हे सिद्ध करता आले आयोग फ्रॉड करतोय हे सिद्ध करता आले असते.
एक धक्कादायक आकडा समोर आणला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, महाराष्ट्रात S. I. R. सर्वेक्षणाखाली तब्बल २ कोटी ९० लाख मतदार कमी होणार आहेत. जर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारांची आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नावे वगळली गेली, तर त्याचा थेट प्रकाश आंबेडकर यांनी केवळ निवडणूक आयोगावरच नव्हे, तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले आहे. आयोगाचा हा तथाकथित ‘फ्रॉड’ पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी राहुल गांधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून पीडित मतदारांच्या भेटी घ्यायला हव्या होत्या, असे त्यांनी सुचवले आहे. केवळ आरोप करण्यापेक्षा पुराव्यांसह मेळावे घेऊन हा विषय लावून धरला असता, तर आयोगाचा खोटरडापणा जगासमोर आला असता, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision) ही प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी, दुबार नावे काढण्यासाठी किंवा मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी राबवली जाते. मात्र, विरोधी पक्षांकडून वारंवार असा आरोप केला जात आहे की, या प्रक्रियेचा वापर करून विशिष्ट विचारसरणीच्या किंवा समुदायांच्या मतदारांची नावे यादीतून जाणीवपूर्वक कमी केली जात आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, निवडणूक आयोग यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us: