उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या वतीने सत्कार

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आले असता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे या समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विस्तारीकरण भवन मंगळवार पेठ पुणे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागेचा आदेश दिल्यामुळे पुणे एअरपोर्ट येथे समिती समन्वयक शैलेंद्र मोरे, नीताताई अडसुळे, स्वातीताई गायकवाड, अर्चना केदारी, मिलिंद आहिरे, सुजाता नाईकवाडे यांनी सत्कार केला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशना वेळी दि. ११/१२/२०२५ रोजी खाजगी बिल्डरला दिलेली जागा राज्य सरकारने परत घेऊन सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरण भवन साठी पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी दि. ८/४/२०२६ रोजी जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव नगर विकास विभाग, महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली असून प्रस्तावाला येत्या आठ दिवसात मान्यता देतो असे एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरणच्या जागे बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी अतिशय सकारात्मक अशी वेळोवेळी भूमिका घेऊन सहकार्य केल्याने स्मारकाला जागा मिळण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. सदर जागा प्रत्यक्षात येत्या महिनाभरात पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात मिळणार असून पुणे महानगरपालिका आणि राज्य सरकार एकत्रित मिळून अतिशय सुंदर आणि समाज उपयोगी सांस्कृतिक स्मारक उभे करणार असून त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी भेटीमध्ये आश्वासन दिले आहे. कमी पडणारा उर्वरित निधी हा पुणे महानगरपालिकेमध्ये तरतूद करण्याचे पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम व नवनिर्वाचित महापौर मंजुषाताई नागपुरे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे गेल्या काही दिवसांपूर्वीच मान्य केले आहे. ४०५, मंगळवार पेठ पुणे येथील जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात मिळताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक कसे असावे याचा आराखडा तातडीने तयार करण्याचे आश्वासन आयुक्त यांनी समितीला दिले आहे. सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरण जागेसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे या समितीच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पासून वेगवेगळे तीव्र आंदोलने करण्यात आली होती. त्या आंदोलनावेळी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नीलमताई गो-हे यांनी समितीच्या प्रमुख शिष्टमंडळा बरोबर सविस्तर चर्चा झाल्यानंतर संबंधित खात्याकडून माहिती घेऊन सांस्कृतिक स्मारक विस्तारीकरण ला जागा देण्याचे आदेश दिले होते.

Please follow and like us: