लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त आयोजित स्वच्छता सप्ताह पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : मा.महापौर, पुणे व मा. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे आदेशांनुसार लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दिनांक २२/०७/२०२६ ते २८/०७/२०२६ व त्यापुढे दिनांक ०५/०८/२०२६ रोजीपर्यंत स्वच्छता सप्ताह राबविण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्ते, सर्व वाहतुकीची ठिकाणे, बस, रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टॅन्ड, विमानतळ इ. चे डीप क्लिन ड्राईव्ह, १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व शाळांचे डीप क्लिन ड्राईव्ह व विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन, सर्व मंडई, मार्केट एरिया व व्यावसायिक क्षेत्र, सर्व शासकीय इमारती, आरोग्य कोठ्या तसेच क्षेत्रिय कार्यालयाच्या इमारती इ.चे डीप क्लिन ड्राईव्ह, सर्व झोपड़पट्टी व वस्ती, सर्व वॉटर बॉडीज (नदी, नाले, तलाव इ.) चे डीप क्लिन ड्राईव्ह, FRR सेंटर्सच्या ठिकाणी ई-कचरा, प्लास्टिक कचरा, फर्निचर, गाद्या, इतर निरुपयोगी वस्तू, घरातील अडगळीचे सामान, देवीदेवतांचे फोटो इ. साठीची संकलन मोहीम, सर्व सार्वजनिक व वस्ती पातळीवरील शौचालयांचे डीप क्लिन ड्राईव्ह असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

या स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ मा. महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे यांचे शुभहस्ते दिनांक २२/०७/२०२६ रोजी श्री विठ्ठल मंदिर, सिंहगड रोड याठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम घेऊन करण्यात आला. यावेळी या स्वच्छता सप्ताहाचे अनुषंगाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांचे परीक्षण केले जाणार असून त्यानुसार उत्कृष्ट कामगिरी करणा-या क्षेत्रिय कार्यालयांस पारितोषिक देण्यात येणार असल्याचे मा. महापौर यांनी घोषित केले होते. त्या अनुषंगाने स्वच्छता सप्ताहामध्ये क्षेत्रिय कार्यालयांनी केलेल्या कामकाजाचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्षेत्रिय कार्यालयांस गौरविण्याकरीता दिनांक १०/०८ / २०२६ रोजी स्वच्छता साप्ताह पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी श्रीमती मंजुषाताई नागपुरे, मा. महापौर श्री. परशुराम वाडेकर, मा. उप महापौर श्री. निलेश निकम, मा. विरोधी पक्ष नेते, श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), श्री. संतोष वारुळे, मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, श्रीमती आशा राऊत, मा. उपायुक्त, परिमंडळ क्र. १, श्री. अविनाश सकपाळ, मा. उपायुक्त, परिमंडळ क्र. २, श्री. विजयकुमार थोरात, मा. उपायुक्त, परिमंडळ क्र. ३ श्री. अरविंद माळी, मा. उपायुक्त, परिमंडळ क्र. ५ श्री. माधव जगताप, मा. उपायुक्त, परिमंडळ क्र.५, क्षेत्रिय कार्यालयाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ. साधना भांगरे, प्र. सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन, श्री. गणेश खिरीड, प्र. उप प्रमुख आरोग्य निरीक्षक, घनकचरा व्यवस्थापन तसेच मुख्य खात्याकडील आरोग्य निरीक्षक टीम, क्षेत्रिय कार्यालयाकडील सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम, स्वच्छ संस्थेचे समन्वयक एच. एम. एस. टीम, इ. उपस्थित होते.

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. मा. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन यांनी कार्यक्रमाचे सुरवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या स्वच्छता सप्ताहामध्ये सर्वच क्षेत्रिय कार्यालयांनी उत्कुष्ट कामगिरी करून शहर स्वच्छतेसाठी आपले मोलाचे योगदान दिले असल्याचे यावेळी मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी सांगितले. तसेच स्वच्छता सप्ताहामध्ये दिनांक २२/०७/२०२६ ते २८/०७/२०२६ या कालावधीमध्ये सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत डीप क्लीन ड्राईव्ह राबवून एकूण ओला कचरा ६३. १ मे. टन, एकूण सुका कचरा ८६. ७ मे. टन, एकूण राडारोडा २४७.३ मे. टन, एकूण प्लास्टिक कचरा ४.५ मे. टन, एकूण अडगळीचे सामान ( गाड्या, फिम, कापड) – ५.२ मे. टन, एकूण देवी देवतांचे फोटो ४७३ इ. संकलन करण्यात आले. या सप्ताहा दरम्यान एकूण १५७२६ नागरिकांनी सहभाग नोंदविला. यानंतर लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचेवरील डॉक्युमेंटरीचे सादरीकरण करण्यात आले.

मा. महापौर व इतर उपस्थित मान्यवर यांचे शुभहस्ते या स्वच्छता सप्ताहाचे प्रथम पारितोषिक कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय ( र.रु.५० लक्ष), द्वितीय पारितोषिक छ. शिवाजीनगर- घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय (र.रु.२५ लक्ष), तृतीय पारितोषिक नगररोड- वाघोली क्षेत्रिय कार्यालय ( र.रु. १५ लक्ष ) तसेच वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय व हडपसर- मांजरी क्षेत्रिय कार्यालय यांस विशेष कामगिरीबाबत उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात सफाई सेवकांना PPE कीटचे वाटप करण्यात आले. मा. महापौर यांचे संकल्पनेतून साकार झालेल्या सेवावारी उपक्रमांतर्गत विजेत्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मा. विरोधी पक्षनेते, मा. उप महापौर व मा. महापौर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले व पुणे महानगरपालिकेमार्फत आयोजित होणा-या अशा विविध उपक्रमांस याचप्रकारे भरघोस प्रतिसाद देऊन शहर स्वच्छतेसाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले. डॉ. साधना भांगरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन यांनी उपस्थित सर्व मान्यवर व अधिकारी / कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले व सदरील कार्यक्रम संपन्न झाला.

Please follow and like us: