डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या कुलपती सौ.आबेदा इनामदार

पुणे : पी. ए.इनामदार युनिव्हर्सिटीच्या कुलपती पदी डॉ. सौ.आबेदा इनामदार यांची नुकतीच नियुक्ती झाल्याने पुणे शहरातील विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने त्यांना शाल, पुष्पगुच्छ, तसेच महात्मा फुले गौरव ग्रंथ आणि भारतीय संविधानावर लिहिलेले पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनमोकळ्या वातावरणात शैक्षणिक विषयांबाबत सकारात्मक चर्चा झाली. शिक्षण हे देशाच्या विकासाचे महत्त्वाचे माध्यम असून यापुढे आगामी काळात काळाची गरज ओळखून सुसंगत शिक्षण देण्याचा प्रयत्न विद्यापीठ करणार असून त्यासाठी रोजगाराभिमुख शिक्षण प्रणाली राबविण्यास प्राधान्य देणार आहोत असे याप्रसंगी कुलपती डॉ. सौ . आबेदा इनामदार यांनी सांगितले.


याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लीगल विभागाचे प्रदेश सचिव ऍड.फैयाज शेख,पुणे जिल्हा विद्यार्थी विकास मंच अध्यक्ष ऍड.सुरेश खुरपे, अनिल शेवरे, श्रीनिवास दिसले, ॲड.आलिफ सय्यद,पुणे शहर युवक काँग्रेसचे प्रेम राजगुरू,वंचित बहुजन आघाडीचे अतुल झोडगे, इत्यादी उपस्थित होते.

Please follow and like us: