पुणे : पुणे शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या प्रकाराबाबत आज पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यासोबतच शहरात गांजाची विक्री करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी केली.
आपल्या पुणे शहरात गांजा विक्रीसारख्या अवैध धंद्यांमुळे विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका वाढत आहे. अनेक नागरिकांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात असून अशा प्रकारांना वेळीच आळा घालून शहरातील तरुणांचे भविष्य सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
त्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पुणे शहरातील विविध भागांत पोलिस गस्त वाढवावी, गांजा विक्रीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि अशा अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. तसेच पुणे शहराला नशामुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची भूमिका यावेळी स्पष्ट केली.