पुण्याचे उपमहापौर वाडेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेट देण्यात आली

पुणे : पुण्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मा. अजितजी डोवाल यांना प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शहा यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. हा सोहळा राष्ट्रसेवा, कर्तृत्व आणि प्रेरणेचा अविस्मरणीय क्षण ठरला.
कार्यक्रमानंतर सन्माननीय केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शहा पुढील दौऱ्यासाठी पुण्यातून रवाना होत असताना, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गृहमंत्री मा. अमित शहा साहेब यांना डॉ. श्रीपाल सबनीस लिखित डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे पुस्तक सप्रेम भेट दिले त्यांनी ते आनंदाने स्वीकारले. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मा. अमितजी शहा साहेब यांना निरोप देण्यास श्रीनाथ यशवंत भिमाले अध्यक्ष – स्थायी समिती, पुणे महानगरपालिका, मा. सभागृह नेते, पुणे महानगरपालिका हेही उपस्थित होते.


यावेळी त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून बाणेर येथे साकारलेल्या देशातील पहिल्या पीपीपी मॉडेल वरील कॅन्सर हॉस्पिटल संदर्भातील माहिती देणारे कॉफी टेबल बुक आदरणीय अमितभाईंना दिले. आणि या भेटीच्या निमित्ताने त्यांना पुढील दौऱ्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार, केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मा. मुरली अण्णा मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण, आमदार मा. सिद्धार्थ शिरोळे, महापौर मा. मंजुषाताई नागपुरे, सभागृह नेते मा. गणेश बिडकर, मा.मंत्री मा.दिलीप कांबळे, मा. आमदार योगेश टिळेकर, मा. जयंत येरवडेकर, नगरसेवक मा.सुनील पांडे, मा. नगरसेवक मा.दीपक पोटे, पोलीस आयुक्त मा.अमितेश कुमार, कलेक्टर मा. डुड्डी साहेब, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. संदीप सिंह साहेब इतर मान्यवर उपस्थित होते.

Please follow and like us: