कोल्हापुरात आठव्या धम्मविचार साहित्य-संस्कृती संमेलनात होणार सन्मान
कोल्हापूर : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आठवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनात लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कचे संचालक सचिन मून यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
रविवार 4 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता दसरा चौक, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या संमेलनात सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार असून, त्याच अंतर्गत सचिन मून यांना ‘धम्मदीप जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. करुणा विमल यांनी दिली. या पुरस्काराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी मानून अविरत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा ट्रस्टचा उपक्रम असल्याचे अॅङ करुणा विमल यांनी सांगितले आहे.
धम्मविचार, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.