आवश्यक परवानग्यांशिवाय अनधिकृत प्लॉटिंग व बांधकाम करणाऱ्यांनी गैरप्रकार तात्काळ थांबवावेत; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील – सोननाथ बनकर, उपायुक्त, पुणे मनपा

पुणे : पुणे विमानतळ परिसरातील बांधकानाबाबत विशेष नियनावली असतानाही लोहगाव येथे उभी राहिलेल्या समृध्दी हायटेक पार्कच्या ११ एकरवरील अनधिकृत प्लॉटिंगसह सिनेंट कॉंक्रीटचे रस्ते जनीनदोस्त पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकान निर्मुलन विभागाचे उपायुक्त, सोननाथ बनकर, यांनी केले. शहराच्या लगतच्या ग्रामीण व निमशहरी भागात जनिनीचे छोटे-छोटे तुकडे करून त्यांची प्लॉट म्हणून विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा अशा प्लॉटच विक्री गुंठेवारी, एनए प्लॉट, मंजूर ले-आऊट, नहापालिका हद्दीत, सर्व सुविधा उपलब्ध अशा शब्दाचा वापर करून केली जाते. मात्र, केवळ जाहिरातीत किंवा विक्रेत्यांच्या बोलण्यात गुंठेवारी असा उल्लेख असणे म्हणजे तो प्लॉट पुर्णपणे कायदेशीर आहे असे समजणे धोकादायक आहे. अनेकवेळा ग्राहकांना आता प्लॉट स्वस्त आहे पुढे सरकारकडून नियनितीकरण होईल असे सांगितले जाते. अशा आश्वासनावर नोठी रक्कन देणे धोकादायक ठरू शकते. नियनितीकरणासाठी कायद्यातील पात्रता संबंधित प्राधीकरणाची प्रक्रिया, आवश्यक शुल्क / दंड, विकासविषयक अटी आणि इतर कायदेशीर बाबी लागू होवू शकतात. नहाराष्ट्र शासनाच्या उपलब्ध कायदेशीर नोंदी नुसार गुंठेवारी नियनितीकरणासाठी निर्धारित शुल्क व विकास शुल्कासंबंधी तरतुदी आहेत. काही विशिष्ट जनिन प्रकारामध्ये अतिरिक्त अटी लागू शकतात. म्हणून आज अनधिकृत आहे. पण उद्या नक्कीच नियनित होईल हा कायदेशीर पुरावा नाही. म्हणून नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे. नुकतेच पुणे महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकान निर्मुलन विभागाकडून ही धडक नोहीन राबवण्यात आली. नहापालिकेच्या या धडक कारवाईनुळे लोहगाव व वाघोली परिसरातील बेकायदेशीर प्लाटिंग करणाऱ्या भूनाफियांनध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सध्या नहापालिकेकडून लोहगाव, वाघोली आणि कल्याणी नगर परिसरातील सर्व अनधिकृत शेड्स, बांधकाने आणि प्लॉटिंगविरोधात व्यापक नोहीन हाती घेण्यात आली. या नोहिनेत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अतिसंवेदनशील अशा विनान लॅडिंग होणाऱ्या परिसरातच अनधिकृत प्लॉटिंगचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोहगाव येथील खां दवे नगर, सर्व्हे क्र. ९७/१० परिसरात समृध्दी हायटेक पार्क या नावाने थेट विमानतळाच्या उड्डाण क्षेत्राजवळ विकसित होत असलेल्या सुनारे ११ एकरच्या बेकायदा, अनधिकृत प्लॉटिंगवर पुणे महानगरपालिकेने गुरूवारी हातोडा चालवला. नहापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साह्याने येथील सिनेंट कॉंक्रीटचे अंतर्गत रस्ते तोडून, तसेच विक्री कार्यालय आणि भव्य जाहिरात फलकही भुईसपाट केले. लोहगाव हे पुणे विमानतळाला लागून असल्याने या भागातील जनिनीचा वापर आणि बांधकानां वर विशेष नियनावली लागू असते. विमानतळाच्या लँडिंग झोनमध्ये अशा प्रकारे कोणतीही परवानगी न घेता व्यावसायिक प्लॉटिंग आणि बांधकाने झाल्याने सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. डेव्हलपर्सकडून शासकीय परवानग्या किंवा एनओसी न घेता नागरिकांना या बेकायदा प्लॉटची विक्री केली जात होती. पुणे नहापलिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकान निर्मुलन विभागाचे उपायुक्त सोननाथ बनकर यांच्या प्रत्यक्ष नार्गदर्शनाखाली ही नोहीन पार पडली.

जनीन खरेदी करण्यापूर्वी प्लॉटच्या सर्व नंजुरी कागदपत्रांची पडताळणी नहपालिकेच्या नगररचना ( टाऊन प्लॅनिंग) विभागाकडून करून घ्या. तसेच नागरिकांची दिशाभूल करून किंवा विमानतळ परिसरासारख्या संवेदनशील भागात आवश्यक परवानग्यांशिवाय अनधिकृत प्लॉटिंग व बांधकान करणाऱ्यांनी हे गैरप्रकार तत्काळ थांबवावेत. अन्यथा संबंधितांवर केवळ अतिक्रमणाची कारवाई न करता कठोर कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील. असे पुणे मनपाचे अतिक्रमण व अनधिकृत बांधका निर्मुलन विभागाचे उपायुक्त, सोननाथ बनकर, यांनी सांगितले आहे.

Please follow and like us: