खा.राहुल गांधी यांच्याविरूध्द दाखल करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण FIR च्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन

जातीय भेदभाव आणि दलितांवरील अत्याचारांविरोधात त्वरित कारवाई झाली पाहिजे

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.श्री.मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्दवानी येथील सभास्थळी भाजप व आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अत्यंत निंदनीय अशा शुध्दीकरण विधीच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा श्री.राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेत ठाम भूमीका घेतली आणि या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्‍यक्तींविरूध्द कठोर कारवाई करून FIR दाखल करण्याची मागणी केली.


मात्र घटनात्मक मूल्यांचा गंभीर अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी, भाजप प्रणित राज्य सरकारच्या दबावाखाली कार्यरत असलेल्या उत्तराखंड पोलीसांनी खा.श्री.राहुलजी गांधी यांच्या विरूध्द हल्दवानी शहर कोतवाली पोलीसांनी धोकादायकपणे FIR दाखल केला. जातीय भेदभाव आणि दलितांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठविणाऱ्या कोणत्याही व्‍यक्तीला दडपण्यासाठी राज्याची संपूर्ण यंत्रणा वापरण्याची त्यांची तयारी दिसून येते. या सुडबुध्दीच्या राजकारणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि उत्तराखंडमधील दोषी भाजप कार्यकर्त्यांविरूध्द तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मा. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या नेतृत्वाखाली आज झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.


यावेळी गटनेते चंदूशेठ कदम म्हणाले की, ‘‘संविधानात अंतर्भूत असलेल्या सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला राज्य पुरस्कृत दडपशाहीच्या कारवायांनी घाबरवता येणार नाही आणि प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक न्याय, घटनात्मक समानता व प्रतिष्ठेसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करीत राहील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा आहे. हा केवळ मल्लिकार्जुन खर्गे यांचा अपमान नसून देशातील कोट्यवधी दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिलेला असताना जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढा देत राहील.’’


यावेळी पुणे मनपा गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या समवेत नगरसेवक साहिल केदारी, सुनिल शिंदे, दिपाली डोख, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष कैलास गायकवाड, खजिनदार चंद्रशेखर कपोते, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे, अनुसूचित विभागाचे अध्यक्ष कुणाल राजगुरू, डॉ.राहुल सावंत, माजी नगरसेविका स्नेहल पाडळे, लता राजगुरू, बाळासाहेब अमराळे, सुरेश नागंरे, फैय्याज शेख, घन:शाम निम्हण, विक्रम खन्ना, हर्षद हांडे, ॲड. योगश माखणे, निलेश बोराटे, प्रियंका रणपिसे, शिवानी माने, ॲड. राजश्री अडसूळ, नयना सोनार, ऋग्वेदिता सपकाळ, सतिश पवार, रवि ननावरे, आबा जगताप, राहुल वंजारी, रविंद्र माझीरे, विशाल जाधव, स्वप्निल नाईक, सुरेश कांबळे, गुलाम हुसेन खान, दत्ता जाधव, शिवाजी भोईटे, अभिजीत महामुनी, ऋषीकेश जाधव, प्रथमेश अबनावे, अस्लम मिरजकर, विठ्ठल गायकवाड, अनुसया गायकवाडे, प्रशांत वाघमारे, धनंजय पाटील, गणेश साळंके, राजू बजेरी, अन्वर पठाण, राजेश जाधव, बाबा तांबोळी, योगेश नायडू, किशोर मारणे, अविनाश अडसूळ, सागर धाडवे, मारूती माने, दिपक ओव्‍हाळ, चेतन पडवळ, अक्षय जैन, भुषण रानभरे आदींसह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: