भेदभाव, अस्पृश्यता किंवा संविधानाने हमी दिलेल्या प्रतिष्ठा व समानतेला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस पक्ष कधीही स्विकारणार नाही – हर्षवर्धन सपकाळ, प्रांताध्यक्ष

पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्दवानी, उत्तराखंड येथील सभेनंतर त्या जागी हिंदुत्ववादी उजव्‍या विचारसरणीच्या संघटनांनी गंगाजलाने शुध्दीकरण विधी केला. धक्कादायक बाब म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे या सभेत उपस्थित राहिल्याने त्या ठिकाणाची विटंबना झाली असल्याच्या करणावरून हे कृत्य करण्यात आले जे अत्यंत निंदणीय आहे.
या कृत्याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथे आंदोलन करण्यात आले.


यावेळी अस्पृश्यता मुर्दाबाद, समता जिंदाबाद, दलितांचा अपमान सहन करणार नाही, सडक्या मनोवृत्तीचा तीव्र निषेध अशा स्वरूपाचे फलक दाखविण्यात आले. यावेळी बोलताना प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. अत्यंत गरीबी व कठिण परिस्थितीचा सामना करून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि आपले संघटनात्मक कौशल्य व दांडग्या राजकीय अनुभवामुळे अनेक पदे भुषविली. विरोधी पक्ष नेते म्हणून राज्यसभेत जनतेचा प्रश्न अतिशय ठामपणे मांडत आहेत. हल्दवानी, उत्तराखंड येथे त्यांची यशस्वी सभा झाली. उजव्‍या विचारसरणीच्या संघटनांनी आपली मनुवादीवृत्ती दाखवून त्या सभेच्या ठिकाणी गंगाजलाने शुध्दीकरण विधी केला ही बाब अतिशय निंदनीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या अत्याचाराविरोधात देशभरात आंदोलन उभारले आणि सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. त्यांनी दिलेल्या संविधानामुळे गोरगरीब कष्टकरी व मागासवर्गीयांना न्याय मिळाला. भेदभाव, अस्पृश्यता किंवा संविधानाने हमी दिलेल्या प्रतिष्ठा व समानतेला कमी लेखण्याचा कोणताही प्रयत्न काँग्रेस पक्ष कधीही स्विकारणार नाही. मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरूध्द ज्यांनी हे जे कृत्य केले त्यांच्यावर उत्तराखंड सरकारने योग्य ती कायदेशिर कारवाई केली पाहिजे अन्यथा काँग्रेस पक्षाला तीव्र आंदोलन करणे भाग पडेल.’’


यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, येशामती ठाकुर, महिला अध्यक्षा संध्या सव्‍वालाखे, गटनेते चंदूशेठ कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, सुनिल मलके, नगरसेवक अरविंद शिंदे, रफिक शेख, विशाल मलके, साहिल केदारी, सुनील शिंदे, अश्विनी लांडगे, दिपाली डोख, वैशाली भालेराव, वीरेंद्र किराड, यशराज पारखी, मेहबुब नदाफ, चंद्रशेखर कपोते, राजाभाऊ कदम, लता राजगुरू, अविनाश बागवे, नीता रजपूत, स्नेहल पाडळे, नुरुद्दीन सोमजी, हनुमंत पवार, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, महिला अध्यक्ष स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, द. स. पोळेकर, लतेंद्र भिंगारे, अक्षय जैन, बाळासाहेब अमराळे, रवि आरडे, शाबीर खान, राजू साठे, राज अंबिके, हर्षद हांडे, फैय्याज शेख, रवि ननावरे, संतोष देसाई, संजय मोरे, संतोष सुपेकर, दिपक ओव्‍हाळ, रमेश सोनकांबळे, रविंद्र माझीरे, अक्षय माने, शिवा भोकरे, राहुल वंजारी, अर्चना शहा, प्राची दुधाणे, अनिता धिमधिमे, सुंदर ओव्‍हाळ, शब्बीर शेख, दत्ता जाधव, सुनिल काळोखे, अनिल धिमधिमे, दादाश्री कामठे, संजय डोंगरे, प्रथमेश आबनावे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Please follow and like us: